Description
Dharmo Rakshati Rakshitah
Dharmo Rakshati Rakshitah E-Book
आजच्या तरूण पिढीला हिंदू धर्माच्या बद्दल, हिंदू धर्म सिद्धांतांबद्दल फारशी माहिती नसते. जी माहिती दिली जाते किंवा सांगितली जाते ती विशुद्ध स्वरूपात सांगितली जात नाही. जे ज्ञान दिले जाते किंवा जे मार्गदर्शन केले जाते त्यामध्ये कर्मकांड भरपूर सांगितलेले असते, त्यामुळे तरुणांना ते वेळखाऊ वाटते. याचा परिणाम म्हणजे तरुण पिढी धर्म या संकल्पनेबद्दल बरीच उदासीन झालेली आहे. दुर्दैवाने त्यांच्यावर अन्य धर्मियांचा खोटा प्रचार हा बॉलीवूड, वृत्तपत्रे आणि अन्य मिडिया या मुळे त्यांच्यावर आदळतो आहे. त्या एकांगी खोट्या प्रचाराच्या जोडीला हिंदू धर्माबद्दल पूर्णपणे अपप्रचार करणारा मजकूरही त्यांच्या वाचनात येतो आहे. त्यांच्या धर्मविषयक प्रश्नांची उत्तरे घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून, पुरोहित किंवा धर्ममार्तंड मंडळींकडून त्यांना मिळत नाहीत. या सर्व घटनाक्रमाचा परिपाक म्हणून तरूण पिढी धर्माबद्दल पराकोटीची उदासीन झालेली आहे आणि वरकरणी तरी त्यात त्यांची चूक नाही. १८१८ साली ब्रिटिशांनी या देशावर राज्य करायला सुरुवात केल्यापासून आजवर, म्हणजे साधारण २०० वर्ष, हिंदू धर्मा बद्दल अतिशय शिस्तबद्ध रित्या प्रचंड गैरसमज पसरवले गेले आहेत आणि ज्याचा परिणाम म्हणून हिंदूंना आपल्याच धर्माबद्दल प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे. याचे अंतिम फलित म्हणजे हिंदू धर्म भारत भूमीवर सुद्धा अल्पसंख्यांक होणे आणि हळूहळू नामशेष होणे, वाचकांना कदाचित कल्पना असेल, आजच आपल्या देशातील ९ राज्यांमध्ये हिंदू धर्म अल्पसंख्यांक झालेला आहे, आणि ही निश्चितच अत्यंत चिंताजनक बाब आहे
Reviews
There are no reviews yet.