उद्गार ट्रस्ट तर्फे आम्ही एक सामाजिक उपक्रम सुरु करतो आहोत.
“ वय वर्ष ७ ते १२ या वयोगटातील सर्वजातीय हिंदू मुलींचा उपनयन सोहळा”
उपनयन याचा अर्थच नेत्रांच्या जवळ .. नेत्रांच्या जवळ काय आहे आज्ञाचक्र. ते जागृत होणे म्हणजे आत्मज्ञान मिळणे. आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन संपूर्ण जीवन धन्य करणे आणि आपल्या कुटुंबाची भौतिक आणि अध्यात्मिक उन्नती साधण्याच्या साठी कार्यप्रवण होणे या साठी उपनयन आवश्यक आहे.

या संस्काराच्या पूर्वी पालकांच्या मनाची आणि देहाची मशागत केली जाणार आहे. सोहळ्याच्या वेळी आणि नंतर उपनयन झालेल्या बटू पुरुष आणि कन्येची पुढील अध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती योग्य पद्धतीने घडावी या साठी सतत संपर्क असणार आहे.
आम्ही सुरुवात पुण्यात करतो आहोत. परंतु हे संपूर्ण राज्यभर करण्याचा मानस आहे
त्यामुळे ज्या पालकांना आपल्या लेकराला धर्मनिष्ठ , लौकिक आणि पारलौकिक जगात एक यशस्वी व्यक्ती म्हणून सर्वार्थाने विकसित होताना पाहायचे असेल आणि हे घडताना त्यात पालक म्हणून स्वतःला सुद्धा कसाला लावण्याची तयारी असेल त्यांनी आवर्जून संपर्क साधा.


Leave a Reply