भगीरथ प्रकल्प ही संकल्पना काय आहे ?
प्राचीन काळापासून मानवाने वस्ती करण्यासाठी निवडलेले ठिकाण हे आवर्जून वर्षभर प्रवाही असणाऱ्या जलसाठ्याच्या किनारी असल्याचे आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे हे अश्याच ठिकाणी वसले आहे जिथे ते वसले गेले त्यावेळी वर्षभर पुरेल असा जलसाठा उपलब्ध होता.
परंतु आज मात्र बहुसंख्य खेड्यांना वर्षभर पुरेल असा जलसाठा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही. सरकार धरण किंवा अन्य जलस्त्रोतातून तो नागरिकांना पुरवण्याची व्यवस्था करते.
भगीरथ प्रकल्प या समस्येचे कायमस्वरूपी समाधान आहे.
हा प्रकल्प राबवल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याला त्यांच्या स्वतःच्या मालकीचा पिण्यासाठी, शेतीसाठी आणि वापरासाठी वर्षभर पुरेल असा जलसाठा निर्माण होईल. हा जलसाठा निसर्गाच्या नियमांचे पूर्ण पालन करून निर्माण केला जाईल. त्यामध्ये अत्यल्प देखभाल करण्याची गरज असेल आणि या प्रकल्पाची योग्य देखभाल केल्यास हा प्रकल्प काही शे वर्ष याच पद्धतीने आणि तितक्याच परिणामकारकतेने आपली सेवा बजावेल. हा प्रकल्प राबवण्याच्या साठी काहीही कृत्रिम लागणार नाही. विजेची सुद्धा गरज नाही.
हा प्रकल्प बहुउद्देशीय आहे. त्यातील पहिला उद्देश संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण वर्षभरासाठी संपूर्ण नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून जलमय करणे आहे.
माझ्या समस्त फेसबुक मित्रांना आवाहन आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात राबवला जाऊ शकतो. या प्रकल्पाला राबवण्यास अत्यल्प खर्च येतो. या प्रकल्पाला अत्यल्प देखभाल लागते.
त्यामुळे ज्यांना आपल्या खेड्यात हा प्रकल्प राबवण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.
माझा फोन क्रमांक आहे ९३७३४५२९०७
जी मंडळी सामाजिक आणि धार्मिक संस्थांशी संलग्न आहेत त्यांना आवाहन आपण हा प्रकल्प राबवण्यासाठी खेडे निवडा आणि आम्हाला सांगा. लोकांना जल प्रदान करणे हे सर्वाधिक पुण्याचे कार्य आहे.
जी मंडळी कॉर्पोरेट मध्ये कार्यरत आहेत त्यांना आवाहन आपण आपल्या कंपनीला CSR मध्ये या प्रकल्पाला राबवण्याच्या साठी प्रेरित करू शकता. ग्रामीण भागासाठी नैसर्गिक पाणीपुरवठा हे CSR चा भाग आहे.
जी मंडळी राजकीय पक्षांशी संबंधित आहेत त्यांना आवाहन आपण आपल्या आमदार, खासदार यांना संपर्क करून त्यांचा निधी या कार्याच्या साठी जर मिळवला तर त्यातून सुद्धा हा प्रकल्प साकारला जाऊ शकतो.
सध्या एका धार्मिक संस्थेच्या मार्फत पुण्याजवळ दोन ठिकाणी आम्ही या प्रकल्पाच्या साठी सर्व्हे केला आहे. आई भगवतीचा आशीर्वाद असेल तर ते दोन्ही प्रकल्प निश्चितच मार्गी लागतील.
हा प्रकल्प राबवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने माझ्याशी विना संकोच संपर्क साधावा.
धन्यवाद.
सुजीत भोगले.
तळटीप :
पाण्याने तुडुंब भरलेली जलकुंड आणि त्यात खेळणारी लहान मुले .. हे फोटो केरळातील आहेत.
पण महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याचे सुद्धा हे भाग्य असू शकते. भर उन्हाळ्यात सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यातील नागरिक असे पाण्याने तुडुंब भरलेल्या जलकुंडात क्रीडा करू शकतात.
फक्त या साठी भगीरथ प्रकल्प राबवावा लागेल.
मी परत सांगतो हा संपूर्ण प्रकल्प १०० % प्रकृतीची नक्कल करून बनवला आहे..
याचे नावच आम्ही MIMIC NATURE असे ठेवले आहे.
निसर्गाची नक्कलच आहे. पण अक्कल वापरून केलेली नक्कल आहे ज्यामुळे आपले जीवन सुखकर होऊ शकते………